Click Here...👇👇👇

पगारदार कर्मचाऱ्यांचे थकीत Lic हफ्ते पाँलीसीधारकाच्या खाती जमा करण्याचे प्रहार शिक्षक संघटना भद्रावतीची मागणी.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- पगारदार शिक्षकांचे नियमित वेतनातून दरमहा Lic हफ्ते कपात होवूनही प्रशासकीय वा तांत्रिक बाबींमुळे रकमा अप्राप्त दाखवून मँच्युरिटीच्या वेडेस कपात केल्या जातात. कार्यालयात चौकशी केली असता स्वत: संबंधित कार्यालयातून सेड्युल वा ईतर बाबी आणा असे सांगितले जाते. कर्मचार्यास सुट्टी काढून व पैसा खर्च करून संबंधित कामे स्वत: करावी लागतात. यात त्यांना नाहक मानसिक त्रास व आर्थिक भूदंड सहन करावा लागतो.
    
 त्यामुळे जि. प. प्राथ. शिक्षकांच्या Lic gap याद्या महीना व वर्ष निहाय तयार करुन संबंधित प्रशासकीय कार्यालयाला पाठवून व उचित कार्यवाही करून त्वरीत संबंधित निधी खातेधारकाच्या खाती जमा करण्यात यावा असे निवेदन प्रहार शिक्षक संघटना तालुका शाखा भद्रावतीच्या वतीने श्री पी.आर. सावर्लापूरकर ,व्यवस्थापक Lic शाखा वरोरा यांना श्री शंकर मिरे तालुकाध्यक्ष भद्रावती, श्री पवन शर्मा तालुकाध्यक्ष वरोरा , श्रीकृष्ण गुजरकर,प्रभाकर मेंगरे, मोरेश्वर विद्ये, किशोर चंदनखेडे व ईतर प्रहार शिक्षक संघटना पदाधिकार्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.