महात्मा फुले वाचनालयाला अशीही एक अनोखी भेट.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 25, 2021
सावली:- आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्ञानजोती फाउंडेशन तथा माळी समाज सावली यांच्या श्रम दानातून निर्माण झालेल्या महात्मा फुले वाचनालय सावली येथील सावली सोशियल फाउंडेशन च्या संचालकांनी भेट दिली. सावली सोशियल फाउंडेशन हे एक सामाजिक संस्था असून दरवर्षी नव नवीन उपक्रम राबवित असतात. असच एकदा महात्मा फुले वाचनालयाला भेट देऊन कोणत्या गोष्टीची कमी असेल तर आमच्या कडून अवश्य मागा अस म्हटले आणि आज त्यांच्या फाउंडेशन कडून २५ खुर्च्या भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या..महात्मा फुले वाचनालय हे सर्वांसाठी खुले असून येथे अनेक विद्यार्थी अभ्यास करतात. वाचनालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारल्या जात नाही. वाचनालयात अनेक बाहेरचे विद्यार्थी सुद्धा अभ्यास करतात. यावेळी सावली सोशियल फाउंडेशन चे संचालक राजा बाळ पाटील संगीडवार, प्रकाश खजांची, मनोज तातकोंडावर, शंकर दिकोंडावार, अमोल तिघलवार, सुरज बोम्मावार, प्रफुल बूटे, राहुल मेरुगवार, किशोर संगीडवार सर, गुरुदास कोसरे, नंदूजी व्यास इत्यादी उपस्थित होते.



           या कार्यक्रमाला संचालन प्रदीप लेनगुरे सर यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला ज्ञानजोती फाउंडेशन तथा संपूर्ण माळी समाज बांधव तसेच सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.