वाघांच्या दर्शनासाठी भारतरत्न परिवारासाहित ताडोब्यात दाखल.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 25, 2021
चंद्रपूर:- मास्टर- ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा ताडोबात दाखल झाला असून, तो चार दिवस येथे मुक्कामाला राहणार आहे. सचिन तेंडुलकर मागील वर्षी 24 जानेवारी 2020 रोजी आपल्या परिवारासह आला होता. 


त्यानंतर आज बरोबर एक वर्षांनी 25 जानेवारी 2021 रोजी पुन्हा एकदा ताडोबाच्या भ्रमंतीसाठी दाखल झालेला आहे. त्याच्यासोबत डॉक्टर अंजली यादेखील आहेत. सचिन आज पहिल्या दिवशी कोअर झोन, बफर झोन आणि व्याघ्रप्रकल्पात भेट दिली.