Top News

राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त तसेच चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स चे संस्थापक स्व. श्री वसंतरावजी दोंतुलवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त वेबिनार आयोजित.

Bhairav Diwase. Jan 30, 2021
पोंभुर्णा:- आज दिनांक 30 जानेवारी 2021 ला चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभूर्णा येथे "हुतात्मा दिवस" साजरा करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 73 व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स चे संस्थापक व पायारचिते सन्माननीय स्वर्गीय श्री वसंतरावजी दोंतुलवार यांच्या स्मृतिदिननानिमित्त वेबिनार आयोजित करण्यात आला होता. आंतर महाविद्यालयीन रांगोळी, निबंध व भाषण स्पर्धा घेण्यात आली होती.


कार्यक्रम आभासी रित्या आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून श्री गोविंदराव मुनघाटे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कुरखेडा येथील डॉ. दीपक बनसोड हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोविदराव मुनघाटे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कुरखेडा येथील डॉ.नरेंद्र आरेकर उपस्थित होते.


    कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर हूंगे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व सन्माननीय वसंतरावजी दोंतुलवार यांच्या प्रतिमेला मालार्पण करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मेघा कुलकर्णी यांनी केले. डॉ. बनसोड यांनी "कोरोना काळातील दिवस पर्यावरण" यावर वेबीनार दिला. डॉ.नरेंद्र आरेकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षण डॉ. मेघा कुलकर्णी,  प्रा. वर्षा शेवटे  व प्रा. सरोज यादव यांनी केले. तसेच स्पर्धेचे विजेते कार्यक्रमाच्या आयोजिका डॉ. वैशाली मुरकुटे यांनी घोषित केले. रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्रतीक पवार व स्वाती चोथाले,  चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा तर द्वितीय पारितोषिक प्रीती ढूमणे चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णा हिने प्राप्त केले. निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्रगती मेश्राम श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा हिने तर द्वितीय पारितोषिक हर्षलता बामनकर श्री सद्गुरू साईबाबा कॉलेज, आष्टी व चारुलता संगमवार,  चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा हिने पटकाविले. भाषण स्पर्धेत प्रथम पारितोषिक तरुण वाढई,  चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा याने पटकाविले तर द्वितीय पारितोषिक रोहिणी गुजलवार, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा हिला देण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट अध्यक्षीय भाषणाने झाला तर आभार प्रा. सरोज यादव हिने मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने