🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स, पोंभूर्णा येथे "हुतात्मा दिवस" साजरा.

Bhairav Diwase. Jan 30, 2021
पोंभुर्णा:- आज दिनांक 30 जानेवारी 2021 ला चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स, पोंभूर्णा येथे "हुतात्मा दिवस" साजरा करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 73 व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स चे संस्थापक व पायारचिते सन्माननीय स्वर्गीय श्री वसंतरावजी दोंतुलवार यांच्या स्मृतिदिन कोवीड-१९ च्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. 

महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. टि. एफ गुल्हाने सर यांनी हुतात्म्यांच्या फोटोला माल्यार्पण केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून हुतात्म्यांच्या फोटोला अभिवादन केले.