🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स गोंडपिपरी येथे हुतात्मा दिन आणि स्व. प्राचार्य वसंतरावजी दोंतुलवार यांची पुण्यतिथी साजरी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी: स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स गोंडपिपरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त हुतात्मा दिन पाळण्यात आला तसेच चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स चे आद्य संस्थापक स्व. प्राचार्य वसंतरावजी दोंतुलवार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रस्तुत कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा स्वर्गीय प्राचार्य वसंतरावजी दोंतुलवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.       या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डॉ. चक्रधर निखाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रा.  डॉ. संजय सिंग,  प्रा. संजय कुमार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अविनाश चकिनारपूवार यांनी केले. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते परंतु या वर्षी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

यावर्षी महाविद्यालयाच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि करिअर गायडन्स सेल तर्फे *सॉफ्ट स्किल* या विषयावर श्री. सागर झा, सॉफ्ट स्किल ट्रेनर, पुणे यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, या प्रस्तुत चर्चासत्रास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या ऑनलाइन चर्चासत्राची लिंक खाली देत आहोत. 


       दैनंदिन जीवनात तथा ज्या विद्यार्थ्यांना  वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं करियर  घडवायचे असेल त्यांना हे चर्चासत्र पाहणे अत्यंत गरजेचे आहे अशे महाविद्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.