🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

गट साधन व्यक्ती कु. कवाडे मॅडम यांची अशीही सतर्कता शाळेचे कार्यालय न गाठता प्रथम वर्ग 10 मध्ये केला प्रवेश.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील पंचायत समिती शिक्षण विभागातील गट साधन तज्ञ व्यक्ती कु. प्रतिभाताई कवाडे मॅडम यांनी मुरसा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय येथे पंचायत राज समितीच्या पूर्व तैयारी संदर्भात भेट दिली
यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात गट साधन तज्ञ व्यक्ती कु. प्रतिभाताई कवाडे मॅडम यांनी शाळेच्या परिसरात प्रवेश करताना सर्वप्रथम कार्यालय न गाठता सरळ वर्ग 10 मध्ये प्रवेश केला वर्गावर गणित शिक्षक श्री नेवारे सर शिकवणी घेत असल्याचे आढळून आले सोबत मॅडम नि पण आपला एक गणिताचा तास घेऊन मुलांना गणिताचे प्रश्न विचारून विद्यार्थी स्थर तपासला, विद्यार्थ्यांनि पण मॅडम च्या प्रश्नांची उत्तरे देऊन समाधान केले.

त्यानंतर वर्ग 8, वर्ग 9 ला भेट देऊन मुलांना अभ्यासाबद्दल सुचना केली वर्ग 8 मध्ये मॅडम चे सर्वप्रथम दरवाज्यावर सानिटायझर व फुलाचा गुच्छा देऊन स्वागत करण्यात आले नुकत्याच सुरू झालेल्या वर्ग 8 च्या मुलांना मॅडम नि खूप सुंदर असे मार्गदर्शन केले कोरोना चा धोका टळलेला नाही सावधगिरी बाळगा अश्या सुचना केल्या
त्यानंतर मॅडम नि पंचायत राज समिती संदर्भात शाळेच्या दस्तऐवजाची पाहणी केली यात राष्ट्रीय बाळ स्वास्थ कार्यक्रम 2017-18 ची आरोग्य तपासणी अहवालाची पाहणी केली शाळेचा परिसर स्वच्छ असल्यामुळे मॅडम नि समाधान व्यक्त केले
या सर्व भेटीच्या नियोजनात तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. धनपालजी फटींग साहेब यांचे  नियोजन व विशेष मार्गदर्शन लाभत आहेत