शेगाव बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून रुग्णांच्या सेवेकरिता आरोग्य केंद्र चालू करावे.

Bhairav Diwase
सचिन भाऊ नरड यांचे राजू भाऊ गायकवाड यांना निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर वा. नरड वरोरा
वरोरा:- शेगाव बु:- शेगाव बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे अपूर्णावस्थेत असलेले बांधकाम पूर्ण करून लवकरात लवकर सुरू करण्याबाबत मा श्री राजू भाऊ गायकवाड अर्थ व बांधकाम सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले. शेगाव बु येथे मागील वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम चालू आहे परंतु बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे तरी आपण स्वतः लक्ष घालून इमारतीचे बांधकाम पूर्ण करून रुग्ण सेवा लवकरात लवकर सुरू करावी
*शेगाव बु प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे अल्प शिल्लक असलेले बांधकाम पूर्ण करून तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून शेगाव बु व परिसरातील 102 गावातील नागरिकांच्या आरोग्य सेवेकरिता लवकरात लवकर आरोग्य केंद्र सुरु करावे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी मा श्री सचिन नरड जिल्हा महामंत्री भाजयुमो , राजु भाऊ बच्चुवार, ईश्वर नरड, कोसुरकर सर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.