(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील बेलगाव येथे राहणाऱ्या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारला दुपारी चार वाजता घडली याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे
योगिता गणेश कुरेकर वय 26 वर्ष राहणार बेलगाव असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव असून घरील व्यक्ती शेतकामासाठी शेतात गेले असता घरात कोणी नसताना योगिता ने घराच्या छताला दोर बांधून गळफास घेतला या घटनेची माहिती घरच्यांना होताच त्यांनी याबाबत पोलिसांना सूचना केल्या पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे .पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.