🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

नवोदय स्पोर्टिंगच्या भव्य व्हाॅलीबाॅल सामन्यांचा थाटात समारोप.

वरोराचा प्रणय ठरला मॅन ऑफ द टुर्नामेंट.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील नवोदय स्पोर्टिंग क्लबतर्फे येथील किल्ला वार्डातील जि.प.प्राथमिक शाळेच्या पटांगणावर आयोजित दोन दिवसीय पुरुष व्हाॅलीबाॅल सामन्यांचा नुकताच थाटात समारोप करण्यात आला.
     दि.३० व ३१ जानेवारी रोजी आयोजित  सदर सामन्यांचे उदघाटन दिनांक ३० जानेवारी  ला सकाळी ११.०० वाजता नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते धनराज आस्वले, प्रमुख अथिती म्हणुन न.प.मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, उपाध्यक्ष संतोष आमणे, पाणी-पुरवठा समिती सभापती चंद्रकांत खारकर,नियोजन व विकास समिती सभापती सुधिर सातपुते,आरोग्य व स्वछता समिती सभापती निलेश पाटिल, महिला व बालकल्याण सभापती रेखाताई राजुरकर, स्थायी समिती सदस्य विनोद वानखेडे, भद्रावती नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक स्पर्धेचे आयोजक प्रफुल चटकी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सदर उद्घाटन समारंभा दरम्यान नवोदय स्पोर्टिंग क्लबचे समस्त खेडाळु तसेच भद्रावती शहरातील अनेक व्हाॕलिबाल प्रेमी व वार्डातील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सदर स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व शिवाजी महाराजांच्या प्रतीमेचे तसेच मैदानाचे पुजन करुन करण्यात आले.स्पर्धेमध्ये विदर्भातील अनेक नामवंत संघांनी सहभाग दर्शविला. त्यामध्ये युथ स्पो.क्लब काटोल,सिटी पोलिस नागपुर,शिवाजी स्पो.क्लब देवळी, स्फुर्ती स्पो.क्लब वरोरा, WSF स्पो.क्लब वरोरा, जिल्हा प्रशिक्षण केंद्र चंद्रपुर,मथुरा स्पो.क्लब चंद्रपुर,केसरीनंदन स्पो.क्लब राजुरा,सुदर्शन स्पो.क्लब वणी,युथ स्पो.क्लब भद्रावती, नवोदय स्पो.क्लब भद्रावती,KYWS स्पो.क्लब व इतर अशा २० संघानी सहभाग दर्शविला. सदर स्पर्धेमध्ये अंतीम सामना युथ स्पो.क्लब काटोल व स्फुर्ती स्पो.वरोरा या दोन संघामध्ये खेळला गेला व युथ स्पो  क्लब काटोलने सरळ दोन सेट मध्ये वरोरा संघाचा पराभव करुन स्पर्धेच विजेते पद पटकविल स्फुर्ती वरोरा संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानाव लागल तृतीय स्थानाकरिता सिटी पोलिस नागपुर व मथुरा स्पो चंद्रपुर यांच्यात सामना झाला त्यात सिटी पोलिस नागपुर संघानी विजय मिळवुन तृतीय स्थान पटकविल मॕन आॕ दि टुर्नामेंटचा मानकरी स्फुर्ती स्पो क्लबचा खेडाळु प्रणय वाभिटकर ठरला,मॕनआॕफ दि मॕच  युथ काटोल संघाचा आसिफ याने पटकाविला, बेस्ट लिफ्टर मनिष मेश्राम, बेस्ट स्मॕशर केवल बारई, बेस्ट ब्लाॕकर राजेश,बेस्ट डिफेन्सर मोदक,बेस्ट सर्विसर जितुसिंग हे ठरले.सदर बक्षिस वितरण समारंभ नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर, भद्रावती पो.स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिलसिंग पवार,कृ.उ.बा.सामीती भद्रावतीचे सभापती वासुदेवभाऊ ठाकरे,माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रफुलभाऊ चटकी, न.प. उपाध्यक्ष संतोषभाऊ आमणे, पाणी पुरवठा सभापती चंद्रकांत खारकर, इत्यादी मान्यवरांच्या हास्ते पार पडला स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता नवोदय स्पो.क्लबच्या आभिषेक काकडे,दिनेश उलमाले,प्रणय पतरंगे,नितीन जगताप,गोपिक भोयर,निखिल काकडे,अक्षय श्रिगीरीवार,प्रविण मत्ते तसेच नवोदय स्पो.क्लबच्या समस्त खेडाळुंनी व सद्स्यांनी मोलाचे सहकार्य केले.