Top News

ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानात कंत्राटी पदभरती.

Bhairav Diwase.     Feb 05, 2021


चंद्रपूर:-  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर अकाऊंटन्ट कम टॅली ऑपरेटर व गेट मॅनेजर ची नेमणुक करावयाची आहे. अधिकची माहिती  www.mahaforest.gov.in आणि www.mytadoba.org या संकेतस्थळावर व प्रकल्पाच्या विविध कार्यालयामध्ये नोटिस  बोर्डावर तपशीलवारपणे दिली आहे.

         इच्छुकांनी परिपूर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, मुल रोड,  चंद्रपूर-442401 दुरध्वनी क्रमांक 07172-251414 यांच्या कार्यालयास पोस्टाने /समक्ष/ई-मेल CCffdtadoba2@Mahaforest.gov.in यावर दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पाठवावे. प्राथमिक छाननीनंतर योग्य उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ दुरध्वनी संदेश /पत्र/ ई-मेल द्वारे कळविण्यात येईल, तसेच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने