चंद्रपूर:- राजकीय व्यासपीठावर एकमेकांच्या विरोधात भूमिका मांडणारे काँग्रेस जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात मात्र वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाले. निमित्त होतं चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलरी परिसरात आयोजित तेलुगू भाषिकांच्या बतकम्मा महोत्सवाचं!
या महोत्सवाला दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवादही साधला. मात्र, कार्यक्रमात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते दोन्ही नेत्यांच्या दिलखुलास डान्सने! उपस्थितांना दाद देत दोन्ही नेते तालावर थिरकताना दिसले. त्यांच्या या अनोख्या अंदाजाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळातही या भेटीची चर्चा रंगली आहे.
राजकीय मतभेद बाजूला ठेवत सांस्कृतिक कार्यक्रमात एकत्र आलेल्या या दोन नेत्यांच्या डान्सचीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

