ताळोब्यात काळ्या बिबट्याचे वास्तव.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Feb 05, 2021


चंद्रपुर:-  पट्टेदार वाघांच्या वास्तव्यामुळे  चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य देशविदेशात नावारूपास आले आहे. येथील पट्टेदारवाघांचा मुक्त संचार पर्यटकांना हमखास दिसत असल्याने या ठिकाणी सेलिब्रिटींचा ही ओढा वाढला आहे. परंतु, आता पट्टेदार वाघांसोबतच दुर्मिळ काळ्या बिबट्याचे वास्तव आढळले असून पर्यटकांनाही दर्शन त्याचे दर्शन होत आहे. 

ताडोबात काळ्या बिबट्याचे दर्शन वन्यजीव छायाचित्रकार अनुराग गावंडे तसेच ताडोबातील गाईड संजय मानकर यांनाही आठवडाभरापूर्वीच झाले.

त्यांनी त्याचे छायाचित्रे टिपले. गावंडे यांना काळा बिबट्या दुस-यांदा दिसला आहे. मागील वर्षीही त्यांना याच बिबट्याचे दर्शन झाले होते.