Click Here...👇👇👇

सौ शोभाताई मंगेश रायपल्ले सहित अनेकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

Bhairav Diwase
नवनिर्वाचित ग्रा.प. सदस्य रामभाऊ ढुमणे यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
 राजुरा:- नुकतीच ग्रामपंचायत ची रणधुमाळी आटोपली आणि सोबतच सरपंच पदाचे आरक्षण ही सुटले या बरोबरच सर्व गावातील लोकांचे राजकीय समीकरणच जणू बिघडले काही ठिकाणी बहुमत ज्या पक्षाचे त्या पक्षाचे राखीव उमेदवार नसल्याने पंचाईत झाली. अशीच गंमत राजुरा तालुक्यातील सिंधी या गावात झाली. काँग्रेस पक्षाचे 4 व भाजप चे 3 असे उमेदवार निवडून आले असताना सरपंच पदाचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील महिला राखीव आल्याने बहुमतात आलेल्या काँग्रेस पक्षाची ची पंचाईत झाली. असे असताना राजकीय सूत्र बदलत सर्वसाधारण महिला प्रवर्गातुन निवडून आलेल्या सौ. शोभा मंगेश रायपल्ले यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने जणू सर्व मार्गच मोकळे झाल्याचे दिसून आले.
           या मुळे निश्चित आता सिंधी ग्रामपंचायत वर काँग्रेस पक्षाच्या झेंडा फडकेल यात शंका नाही सौ. शोभाताई रायपल्ले सोबत मंगेश रायपल्ले, बाबा मट्टे, मंगलमूर्ती वाघाडे, तिरुपती धानोरकर,  यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला या वेळी राजुरा नगर परिषद अध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ नेते आबाजी पाटील ढुमने, रंजन लांडे, मधुकर धानोरकर, विनोद ढुमने, अजय रेड्डी, नामदेव चिडे , रवी होरे, भास्कर मोरे, रामभाऊ ढुमने, मधुकर टेकाम, राजू दामेलवार, विनोद दरेकर, मंगेश घुबडे, रवींद्र चंद्रागडे, इर्शाद शेख, राहुल धानोरकर,राजु धानोरकर, हेमंत दाते, विजय ढुमने, गुणवंत मोरे,उमेश मोरे  उपस्थित होते.