🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पैनगंगा खुल्या खाणीत दुर्घटना.

ASDC कंपनीतील इलेक्ट्रिशियनचा दुर्दैवी मृत्यू.
Bhairav Diwase.     Feb 05, 2021
चंद्रपूर:- पैनगंगा ओपणकास्ट प्रकल्पात 5 फेब्रुवारीच्या मध्यरात्री इलेक्ट्रिशियन सचिन करमनकर हे लोडिंग मशीनच्या वायरिंग चे काम करीत असताना अचानकपणे मशीनच्या चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

      ASDC कंपनीतील इलेक्ट्रिशियन सचिन करमनकर नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होते. मात्र मध्यरात्री 2 ते 3 वाजेदरम्यान लोडिंग मशीनच्या वायरिंग मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने करमनकर यांना बोलाविण्यात आले . मशीनच्या वायरिंगचे काम करीत असताना बाजूला सरफेस मायनर मशीनचे काम सुरू झाल्या त्या मशीनच्या कंपनामुळे अचानक लोडिंग मशीन मागे आली.
      
     कारण त्या मशीनचे हॅन्डब्रेक वाहन चालकाने लावले नव्हते . लोडिंग मशीनच्या चाकात आल्याने सचिन करमनकर यांचा जागीच मृत्यू झाला ते वय अंदाजे 28 वर्षाचे होते. या घटनेमुळे पुन्हा एकदा वेकोली प्रशासनाचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे, खाजगी असो की शासकीय कर्मचारी वेकोली सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नेहमी मागेच असते. या दुर्घटनेनंतर कामगारात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.