मनपा स्‍थायी समिती सभापतीपदी रवी आसवानी.

Bhairav Diwase
महिला व बालकल्‍याण सभापतीपदी सौ. चंद्रकला सोयाम, उपसभापतीपदी पुष्‍पा उराडे.

झोन सभापतीपदी राहूल घोटेकर, अंकुश सावसाकडे, सौ. संगीता खांडेकर‌.
Bhairav Diwase.     Feb 05, 2021

चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्‍या आज झालेल्‍या स्‍थायी समिती सभापतीपदासह झोन सभापती व महिला व बालकल्‍याण समिती सभापती पदाच्‍या निवडणूकीत भाजपाने आपले वर्चस्‍व कायम राखले असून स्‍थायी समिती सभापतीपदी रवी आसवानी हे निवडून आले आहेत. महिला व बालकल्‍याण समिती सभापतीपदी सौ. चंद्रकला सोयाम तर उपसभापतीपदी सौ. पुष्‍पा उराडे यांची निवड झाली आहे.
 
झोन क्रमांक 1 च्‍या सभापतीपदी अॅड. राहूल घोटेकर, झोन क्रमांक 2 च्‍या सभापतीपदी सौ. संगीता खांडेकर तर झोन क्रमांक 3 च्‍या सभापतीपदी अंकुश सावसाकडे यांची निवड झाली आहे.
 
चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी यांच्‍यासह सर्व नवनियुक्‍त पदाधिका-यांचे माजी अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, महानगर सरचिटणीस राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरनुले, भाजयुमो महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, महिला मोर्चा महानगर जिल्‍हाध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, मनपा सदस्‍य वसंता देशमुख, अनिल फुलझेले, सुभाष कासनगोट्टूवार, संजय कंचर्लावार, संदीप आवारी, देवानंद वाढई, राजेंद्र अडपेवार, सोपान वायकर, सौ. छबू वैरागडे, सौ. आशा आबोजवार, सौ. माया उईके, सौ. शिला चव्‍हाण, सौ. शितल गुरनुले, सौ. वनिता डुकरे, सौ. वंदना जांभुळकर, सौ. जयश्री जुमडे, सौ. शितल आत्राम, सौ. सविता कांबळे, सौ. वंदना तिखे, प्रशांत चौधरी, कु. शितल कुळमेथे, सौ. अनुराधा हजारे, सतिश घोनमोडे, सौ. खुशबु चौधरी, स्‍वामी कनकम, सौ. ज्‍योती गेडाम, सौ. कल्‍पना बगुलकर, सौ. निलम आक्‍केवार, रामपाल सिंह, राजीव गोलीवार आदींनी अभिनंदन केले आहे.