सिंदेवाही तालुक्यातील लग्न आटपून निघालेल्या वरातीच्या गाडीला अपघात.

Bhairav Diwase
04 वराती जागीच ठार तर 20 जण गंभीर जखमी.


चीचपल्ली च्या बांबू प्रशिक्षन केंद्राला भीषण आग... 
Bhairav Diwase.        Feb 25, 2021

सिंदेवाही:- तालुक्यातील रत्नापूर या गावावरून नवरदेवाची वरात लग्न लावून एकारा येथून आपल्या गावी परत जात असताना कच्छेपार येथे रोड वरून मेटाडोर रोड खाली उतरल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 20 जण गंभीर जखमी आहे.

सविस्तर वृत्त असे की, सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे नवरदेव व त्याचे सगेसोयरे रत्नापूर येथून वधू ला सोबत घेऊन जात असताना कच्छेपार या ठिकाणी मेटेडोअर पलटी झाल्याने 04 लोकांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जखमींना सिंदेवाही च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली असून वृत्त लिहिस्तोवर कोणतीही अधिकृत माहिती रुग्णालय प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाकडून प्रसारित करण्यात आली नाही.