Top News

दोन दुकाने फोडून चोरांनी केले नवीन ठाणेदाराचे स्वागत.

निष्क्रीय डी.बी. बरखास्त करा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- सुस्वागतम् सुस्वागतम हे शब्द एखाद्या निवेदकाकडून स्टेजवर ऐकु येतात तेव्हा मान्यवर पाहुन पोहचले आहेत असा त्याचा अर्थ काढला जातो. सामान्यपणे असे चांगल्या कार्यक्रमात घडत असते परंतु हा किल्ला राजुरा येथील चोरांनी गिरविला असून नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार श्री चंद्रशेखर बहादुरे यांचे स्वागत शहरातील मुख्य मार्गावरील रहदारीच्या ठिकाणी दोन दुकाने फोडून केल्याने ही बाब शहरात व परिसरात चर्चेची ठरली आहे.
   
      गेल्या एक वर्षापासून राजुरा पोलीस स्टेशन परिसर अवैध धंद्यासाठी गाजत आहे. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री स्वप्नील जाधव यांच्या बदलीनंतर अवैध धंदेवाल्यांना जणू काही रानच मोकळे झाले होते. तत्कालीन ठाणेदार श्री नरेंद्र कोसुरकर स्वभावाने जरी चांगले असले तरी अल्पकाळ नौकरी असल्याने कमाईच्या नादान त्यांची कर्मचारी व अवैध धंदे करणे वाल्यावर पकड ढिली झाली होती ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. एवढेच नव्हे तर डी.बी मधील पी.एस आय व कर्मचाऱ्यांना सैल सोडल्याने अवैध धंदेवाल्यांची चांदी झाली त्यामुळे कोळसा चोरी, भंगार, चोरी, दारू विक्री, गांजा विक्री, ब्राऊन शुगर, कोंबडा बाजार, सेंडामुंडी, फसवणुक, चोऱ्या घरफोड्या, चैन स्नॅकीग, पीक पाकेटींग, धमक्या इत्यादी धंद्यात वाढ झाली.
           मा. जाधव साहेब चार्ज देऊन गेल्यावर त्यांचा प्रभार स्वीकारणारे कधी काळी राजुऱ्यातील गुन्हेगाराचे कर्दनकाळ समजले जाणारे व "नायक नही खलनायक हू में" असे सांगणारे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यकाळात आर्वी या गावान खुल्लेआम कोंबडा बाजार सुरू झाल्याने नागरिकांच्या उरल्या सुरल्या अपेक्षाही भंग झाल्या. शेवटी या कोंबडा बाजाराविरुद्ध माजी आमदार वामनराव चटप, संदिप गीऱ्हे, सुरज ठाकरे यांनी दंड थोपटल्याने हा कोंबडा बाजार बंद झाला हे सर्वश्रुतच आहे.
        
      राजुरा पोलीस उपविभागाचा पुर्णवेळ कार्यभार सांभाळण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजा शेरसिंग पवार आलेत. त्यानी सुत्रे हाती घेतल्यापासून जवळपास एक महिना झाला परंतु अवैध धंद्याविरुद्ध त्यांच्याकडून कोणतीही हालचाल झाल्याचे दिसत नाही. अजुनही ते बिळाच्या बाहेर निघाले नाहीत. त्यामुळे अवैध धंद्यावर आळा बसेल काय यावर प्रश्नचिन्ह आहे. 
      
                तत्कालीन ठाणेदार नरेंद्र कोसुरकर यांनी अवैध धंद्याच्या बाबतीत संपुर्ण आभाळालाच भोके पाडून ठेवली असल्याने नवीन ठाणेदार किती भोके बुजवितात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. राजुरा पोलीस स्टेशन मधील डीबीला कॅन्सर झाला असून तो नष्ट करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोळसा, दारू, भंगार याच्या दलालीसाठी प्रसिद्ध असलेल्या दलालाची "नाळ" कापणेही गरजेचे आहे. राजुरा डी.बी. व तेथे कार्यरत पोलीस कर्मचारी केवळ "सदरक्षणाय, खलनिग्रहणाय.."  ब्रीद वाक्याचे जतन करित असल्याने डी. बी वर नियत्रंण आणल्यास पोलीस स्टेशन परिसरातील अनेक अवैध धंदे बंद पडल्याशिवाय राहणार नाही.
                
   नूकतेच रुजू झालेले ठाणेदार श्री चंद्रशेखर बहादुरे आपल्या नावाप्रमाणे बहादुरी दाखवून अवैध धंदेवाल्याची नकल कसतात की येरे माझ्या मागल्याचा कित्ता गिरवुन अवैध धंदेवाल्यांना खतपाणी घालतात याकडे राजुरावासीय नागरीकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने