Top News

फुटाणा मोकासा व भीमनगर येथे दारूच्या अवैध विक्रीला उधाण; दारु विक्रीवर आळा घालण्याची भाजयुमोची मागणी.

Bhairav Diwase. Feb 01, 2021
पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील परंतु मूल पोलीस ठाण्याअंतर्गत बेंबाळ पोलीस दूर क्षेत्राच्या हद्दीतील फुटाना मोकासा व लागूनच असलेल्या भिमनगर येथे अनेक महिन्यांपासून अवैध देशी दारू मोठ्या प्रमाणात विकल्या जात असून चार ते पाच किलोमीटर अंतरावर बेंबाळ पोलीस स्टेशन असून हा प्रकार राजरोसपणे कसा चालु आहे. हे आश्चर्यच आहे असे भाजयुमोचे नैलेश चिंचोलकर, विनोद ओदेलवार व अमोल पाल यांनी म्हटले आहे.


🚨राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांचे दुर्लक्ष.......🚨
पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. विचित्र भौगोलिक रचना असलेल्या पोंभूर्णा तालुक्यातील परंतु मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाणा मोकासा व भीमनगर येथे अवैध दारू विक्री सुरू असून ही विक्री किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री सुरू असल्याचे दिसत आहे. प्रमाणात दारूची सर्रास वाहतूक व विक्री होत आहे. यामुळे अनेक गरिबांचे संसार उध्वस्त झालेले दिसत आहेत. गावा गावात पाहिजे तिथे दारू मिळत असल्यामुळे शाळकरी मुलांचे ही या व्यसनाकडे लक्ष जाणे सुरू झाले आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होऊन आरोग्य सोबतच स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करीत आहेत. मात्र यावर आळा केव्हा बसेल? असा प्रश्न सामान्य नागरिक आता करू लागले आहेत . फुटाना मोकासा व भीमनगर येथील अवैध चालू असलेली दारूविक्री मूल पोलिसांनी बंद करावी अशी मागणी भाजयुमोचे ज्येष्ठ कार्यकर्ते व भारतीय जनता युवा मोर्चाचे नैलेश चिंचोलकर, विनोद ओदेलवार, अमोल पाल व नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने