🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

सुरक्षा रक्षकांची रायफल आणि काडतूसे पळविणारे आरोपी अटकेत.

12 बोर रायफल आणि जिवंत काडतूस जप्त.
Bhairav Diwase.      Feb 01, 2021
चंद्रपूर:- जवळील एसीसी सिमेंट कंपनीच्या सिंदोला माईन्स येथील अमोनिया स्टोरेज टॉवर मध्ये तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना मारहाण करून त्यांचेकडून डबल 12 बोर रायफल आणि 10 राउंड जिवंत काडतुसे पळविणा-या ५ आरोपींना रविवारी अटक करण्यात आली आहे.

त्यांचेकडून रायफल आणि ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपी मध्ये प्रशांत उर्फ पशी राजेंद्र मालवेणी (२४), कार्तिक उर्फ नानी दुर्गेश कोडापे (२०), श्रिकांत उर्फ चिट्टी भिमय्या सोप्परी (२६), बबलू पिंगली, विजय उर्फ अंडया भास्कर त्याने (२४) यांचा समावेश आहे. तर आरोपी श्रिकांत उर्फ चिट्टी भिमय्या सोप्परी याचेकडून बारा बोर रायफल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली आहे.


प्राप्त सुत्रानुसार, 21 जानेवारी ला सायंकाळी 7 च्या सुमारास एसीसी सिमेंट कंपनीच्या सिंदोला माईन्सच्या अमोनिया स्टोरेज टॉवर वर (एस.आई.एस.)सुरक्षा कंपनीचे गैंगमन रामजी जग्गी सिंग तर खाली इरफान सिकंदर शहा आदीं तैनात होते. तोंडावर मुखवटा परिधान केलेले तिन अज्ञान व्यक्तींनी दोन्ही सुरक्षा रक्षकांना मारहाण करून सुरक्षा रक्षक इरफान सिकंदर शहा यांचेकडील 12 बोर रायफल आणि दुहेरी बॅरेलचे 10 जिवंत काडतुसे हिसकावून मोटार सायकलने पळ काढला होता. त्यांचेवर वणी तालुक्यातील सिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून रायफल आणि काडतूस घेवून आरोपी फरार होते.

याच घटने प्रमाणे घुग्घूस येथील एसीसी सिमेंट कंपनी मध्येही पाच ते सहा आरोपींनी भंगार चोरण्याचा प्रयत्न २० जानेवारीला केला होता. यावेळी सुरक्षा रक्षक श्यामसुंदर प्रजापती यांनी भंगार चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सुरक्षा रक्षकाला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. जखमी सुरक्षा रक्षक तेव्हा पासून रूग्णालयात उपचार करीत होते.

सदर घटनेची तक्रार २९ जानेवारी ला घुग्घूस पोलिस ठाण्यात दाखल केली. डी. बी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पाच सशंयीताना ताब्यात घेतले. सदर आरोपींनी घुग्घूस एसीसी सिमेंट कंपनीतील सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचे कबूल केले. तसेच सिंदोला माईन्स मधील सुरक्षा रक्षका रक्षकाकडून रायफल आणि काडतूस पळविल्याची कबुली दिली. दोन्ही घटनेतील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात एपीआय नागलोत, पीएसआय गौरीशंकर आमटे, पोलीस शिपाई मनोज धकाते, महेंद्र वन्नकवार, सचिन बोरकर, नितीन मराठे, रंजीत भुरसे, सचिन डोये, रवींद्र वाभीटकर यांनी आरोपी श्रिकांत उर्फ चिट्टी भिमय्या सोप्परी याचेकडून 12 बोर रायफल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली आहे.