Top News

राजुरा ब्रेकिंग न्यूज; राजु यादव हत्याकांडातील आरोपींना अटक.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुर: - चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा शहरात वर्दळीचे ठिकाण असलेल्या नाका नंबर ३ येथील मयूर सलूनमध्ये कटिंग करीत असताना अज्ञात मारेकऱ्यांनी कोळसा व्यवसायीकाची देशी कट्याने गोळ्या झाडून हत्या केल्याची थरारक घटना घडली. राजू यादव (वय ४५) असे ठार झालेल्या कोळसा व्यावसायीकाचे नाव आहे. ही घटना आज (दि.३१) सायंकाळी ६:०० च्या सुमारास घडली असून घटनेच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अज्ञात मारेकऱ्यांचा नागरिक आणि पोलिसांनी पाठलाग केला, परंतु ते दुचाकी रस्त्यात सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. सदर व्यावसायिकांची हत्या कोळसा तस्करीतून झाली असावी असा अंदाज वर्तविल्या जात आहे. राजुरा शहरातील नाका नं. ३ हे वर्दळीचे ठिकाण असून येथे अवैध व्यवसाय वाढीस लागत आहेत. या घटनेनेने भितीमय वातावरण निर्माण झाले असून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. राजुरा पोलीसांनी कोळसा व्यावसायिकांचा मृतदेह ताब्यात घेवून आरोपीला पकडण्याची कारवाई रस केली होती.

कोळसा व्यापाऱ्यांवर झाडल्या गोळ्या, राजुऱ्यात गोळीबार.


आरोपी चंदन सितलाप्रसाद सिंग ( वय ३० ) जवाहर नगर, सत्यंद्र कुमार परमहंस सिंग ( वय २८ ) हनुमान नगर रामपूर अशी असून यावर कलम ३०२ , ३४ भादंवि ७/२७ नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे . घटनेप्रसंगी आरोपींनी वापरलेली दुचाकी एम एच ३४ , बी टी २५२४ आणि पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.

न्युज व्हिडिओ पहा.....
👇👇👇👇👇👇👇



सदर कारवाई राजुराचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजासिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे, पोलिस शिपाई श्रीकांत चन्ने, चेतन टेंभुर्णे आणि टिम करीत आहेत. दरम्यान खुन झालेल्या मयुर सलून आणि आरोपी राहत असलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रथमदर्शनी सास्ती, राजुरा, बल्लारपूर येथे कोळसा खानीत होणाऱ्या कोळसा व्यापारातून व यासंबंधीत वादातून सदर खून झाल्याचा संशय आहे. मारेकऱ्यांनी पिस्तूलीचे चार राऊंड फायर केले होते. घटनेत वापरलेले पिस्तूल, दुचाकी आणि दोन आरोपी ताब्यात घेतले असून अधिक तपास केल्यानंतर यासंदर्भात अधिक माहिती देता येईल.
चंद्रशेखर बहादुरे,
पोलीस निरीक्षक राजुरा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने