गडचिरोली:- नक्षल्यांनी आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलिस ठाण्यांतर्गत पुरसलगोंदी येथे एका इसमाची गोळ्या झाडून हत्या केली. अशोक कुरचामी(३४) रा.मंगुठा, ता.अहेरी असे मृत इसमाचे नाव आहे. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी ही हत्या केल्याचा अंदाज आहे.
मृतक अशोक कुरचामी हा एटापल्ली तालुक्यात वास्तव्य करीत होता. आर्थिक अडचणीमुळे तो पैसे मागण्यासाठी पुरसलगोंदी येथे आपल्या सासऱ्याकडे गेला होता. ही बाब कळताच आज दोन साध्या वेशभूषेतील नक्षली अशोकच्या सासऱ्याच्या घरी गेले आणि पिस्तुलातून चार गोळ्या झाडून त्याची हत्या केली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.