वाहनचालकाचे गाडीवरून सुटले नियंत्रण, अन् चारचाकी वाहन थेट घरात.

Bhairav Diwase
0
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपीपरी:- तालुक्यातिल विठ्ठलवाडा मार्गावर वाहन क्र. UP 93 BD 7402 ही चारचाकी गोंडपिपरी मार्गे गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने आष्टीकडे जात होती. अश्यातच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अन् चारचाकी वाहन रस्त्यानजिक एका घरात घूसले. ही घटना विठ्ठलवाडा गावाजवळ 3:00 वाजताच्या सुमारास घडली. गावच्या बसस्थानकाजवळ सिंधुबाई सरवर यांचे विटा- कवलुचे कच्चे घर आहे.
अश्यातच हे वाहन इतके भरधाव वेगात होते की, रोडच्या कडेला उतरून थेट घराच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीला भगदाळ पाडून चारचाकी घरात घूसली. त्यात सरवर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने सरवर कुटुंब उघड्यावर आले आहे. वाहनातील असलेले कुटुंब यातून सुखरूप बचावले. या घटनेची माहिती गोंडपिपरी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)