🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

शब्दाकूंर फाॅऊडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर.

कवी मधुकर दुफारे यांची सर्वोत्कृष्ट रचना तर उत्कृष्ट रचना कवी राहुल पिंपळशेंडे.
Bhairav Diwase.       Feb 26, 2021

चंद्रपूर:- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्य शब्दांकूर फौंडेशन,चंद्रपूर मार्फत काव्यलेखन स्पर्धा १९ फेब्रुवारीला घेण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य,जीवन,स्वरूप,स्वराज्य यासारखे विविध पैलू काव्यलेखनातून दिसून आले.राज्यभरातून एकूण ७२ कवी/कवयित्री यांनी सहभाग नोंदविला होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी काव्यलेखन स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग लाभला.
           या राज्यस्तरीय स्पर्धेचे परीक्षण सांगलीतील ज्येष्ठ साहित्यिक मुबारक उमराणी यांनी केले आहे. त्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रचना कवी मधुकर दुफारे यांची तर उत्कृष्ठ रचना कवी राहूल रामदास पिंपळशेंडे यांची ठरली आहे तसेच प्रथम क्रमांक प्राप्त करणारे कवी प्रा.प्रशांत खैरे,कवी ओंकार राठोड,कवी अशोक बोरकुटे,द्वितीय क्रमांक कवी पुरषोत्तम मैद,कवी खंदारे सूर्यभान गुणाजी,कवी जगदीश्वर मूनघाटे,तृतीय क्रमांक कवी निरज आत्राम,कवयित्री संगीता महाजन,कवी राकेश डाफळे,उत्तेजनार्थ  कवयित्री वर्षा फटकाळे,कवी योगेश धोडरे, कवी प्रफुल्ल मुक्कावार,कवी नरेश बांबोळे,कवी के एन बावणे,लक्षवेधी क्रमांक कवी खेमदेव कन्नमवार,कवी सुनिल पोटे,.कवी भा.रा. कडू,
           कवी प्रशांत भंडारे,भावस्पर्शी
           कवयित्री रझिया इस्माईल जमादार,.कवयित्री सीता कुदळे,
           मा.कवी अनिल आंबटकर यांची आहे.या स्पर्धेचे ग्राफिक्स संजय सेलोकर यांनी केले असून सर्व विजेते कवी/कवयित्री यांना गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सहभागी कवींना देखील प्रमाणपत्र देण्यात आले.
                   राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यस्पर्धेच्या यशस्वीतेकरिता दुशांत निमकर,राजेश्वर अम्मावार,किशोर चलाख,राकेश शेंडे,सौ उषा निमकर,आशिष ढवस,तानाजी अल्लीवार,प्रशांत खुसपुरे यांचे सहकार्य लाभले आहे.