चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राला आग लागणे म्हणजे वनविभागाचा निष्काळजीपणा:- जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले.

Bhairav Diwase
घातपात असो किंवा निष्काळजीपणा दोषी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा.
Bhairav Diwase.          Feb 26, 2021
चंद्रपूर:- आशिया खंडातील सर्वात मोठा बांबु विषयक प्रकल्‍प असलेल्‍या चिचपल्‍ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील मोठ्या इमारतीला काल गुरुवार (दि.२५)ला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. लागलेली ही आग इतकी भयानक होती की काही वेळातचं बांबूपासुन निर्मित संपूर्ण इमारत धाराशाही झाली.



या घटनाक्रमाची महिती होताच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण प्रकारची पाहणी केली. याठिकाणी बोलतांना, सौ. गुरनुले यांनी संबंधित निष्काळजी वन प्रशासनाला धारेवर धरले. आज संपूर्ण आशिया खंडात नाही अशी इमारत चिचपल्ली सारख्या ग्रामीण भागात बनवून आदरणीय आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी येथील वनवैभवाचा विकास व्हावा यादृष्टीने मोठे स्वप्न पाहिले होते. परंतु आज घडलेली घटना ही अतिशय दुर्देवी असून यात वनविभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसुन येतो. इथे भव्यदिव्य बांबूची इमारत उभी असतांना सुद्धा बाजूला वणवा लावण्यात आलेचे चित्र दिसते, हे अतिशय खेदजनक आहे. त्यामुळे हे घातपात असो किंवा निष्काळजीपणा यामध्ये दोषी आढळून येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.