सावली:- यावर्षीच्या पावसाळ्यात अतीवृष्टीने निवासी घर पुर्णता क्षतीग्रस्थ होवुन निवारा हरविलेल्या डोंगरगांव येथील दिलीप नारायण राऊत यांना पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांचे कडुन रुपये पाच हजार रूपयांची रोख आर्थिक मदत देण्यात आली.
घरात आधीच अठरा विश्व दारिद्र्यात जिवन जगणा-या दिलीप राऊत यांचे राहते घर यावर्षीच्या पावसाळ्यात अतीवृष्टीने पडुन पुर्णतः राहण्या अयोग्य झाले होते, याबाबतची माहीती कांग्रेस पक्षाचे स्थानीक कार्यकर्तै पिंटेश वाकडे यांनी कांग्रेसचे जेष्ट नेते राजेश शिद्धम यांचे मार्फत पालकमंत्री ना विजय भाऊ वडेट्टीवार यांचे पर्यंत पोहचविली.परिस्थीतीचे गांभीर्यपूर्वक विचार करून सामाजीक जाणीवेतून ना.विजय वडेट्टीवार यांनी स्वत:कडुन पाच हजार रुपये आर्थीक मदत पाठविली.
सदर पाच हजार रूपयांची आर्थीक मदत कांग्रेस चे जेष्ट नेते राजेश भाऊ शिद्धम यांचे हस्ते गुरूवारला देण्यात आली.सदर मदत ही सामाजीक बांधिलकी जोपासणारी असुन वडीलो पार्जीत राहते घर भुई सपाट होवुन बेघर झालेल्या कुटुंबास शासकीय निधीतुन निवारा मिळावा अशी मागणी राऊत कुटुंबियांनी उपस्थीतांच्या माध्यमातुन ना पालकमंत्र्यांच कडे केली, यावेळी कांग्रेस पक्षाचे स्थानीक प्रमुख कार्यकर्तै पिंटेश वाकडे, पाथरीचे रामु पाटील ठीकरे, डोंगरगांव चे सरपंच रेवणनाथ चुनारकर, सामाजीक कार्यकर्ते दिलीप फुलबांधे, किशोर मलोडे,ग्राम पंचायत सदस्या सौ,पिंकी चुधरी,सौ,स्वाती लोणारे,चंद्रशेखर म्हस्के,भगवान पा.म्हस्के,धर्मराज करोडकर इत्यादींची उपस्थीती होती.