सरपंच पदी सुप्रिम गद्वेकार, तर उपसरपंच पदी शितल पाल यांची बिनविरोध निवड.
पोंभुर्णा:- स्मार्ट ग्राम घाटकुळ ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकरी ग्रामीण विकास आघाडीचे 06 उमेदवार निवडून आले. आज सरपंच व उपसरपंच पदी निवड पार पडली. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ स्मार्ट ग्राम घाटकुळ ग्रामपंचायत सरपंच पदी सुप्रिम गद्वेकार, तर उपसरपंच पदी शितल विनोद पाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. व नवनिर्वाचित सदस्य श्री विठल जी धदरे, जयपाल जी दुधे, सौ रजनी हासे, सौ रंजना चागंदेव राळेगावकर यांची निवड झाली. ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.
सरपंच पदी सुप्रिम गद्वेकार, तर उपसरपंच पदी शितल विनोद पाल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी अर्थ तथा वन नियोजन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराजजी अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, भाजयुमो तालुकाध्यक्ष अजय मस्के यांनी अभिनंदन केले.