चंद्रपूर:- अल्पवयीन मुलगी ही गंजवार्ड येथील एका संनदिकेतील ही वास्तव्यात आहे. याअल्पवयीन प्रेयसी चे तुकुम परिसरातील एका युवकावर प्रेम होते. अल्पवयीन मुलगी दहावीचे शिक्षण घेत आहे. अल्पवयीन मुलगी दहावी अनुत्तीर्ण आहे त्यामुळे तिने दहावी पास होऊन पुढील शिक्षण घेण्याची इच्छा प्रियकराकडे व्यक्त केली. त्यानंतर प्रियकराने प्रेयसीला दहावी पास करण्याकरिता आपल्या मित्रांकडे प्रस्ताव ठेवला. प्रियकराने तो प्रस्ताव एका मित्राकडे ठेवला. मित्राने उत्तीर्ण होण्याकरिता पैसे मोजावे लागतील असे सांगितले . प्रियकर आणि प्रेयसी हे दोघेही पैसे जमविण्यायाचा निर्णय घेतला. तर प्रेयसीने आपल्या शेजारी असणाऱ्या एका कुटुंबाचा अलमारी मधून सोन्याचे दागिने लंपास केले. काही वेळानंतरशेजाऱ्यांनी चोरीची घटना शहर पोलिस स्टेशनात केली. व चोरीचा गुन्हा दाखल केला .स्थानिक गुन्हे पथकाणे या चोरीची तपासणी करण्याकरिता शोध केले असता तुकुम परिसरातील एक मुलाचे नाव समोर आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केलीअसता दुसऱ्या मित्राचे नाव समोर आले. व ही चोरी अल्पवयीन मुलीने केली असे समोर आले. यावेळी या दोघांनी चोरीची कबुली दिली. चोरीचे सोने गहाण ठेवण्याकरिता मदत करणाऱ्या मित्राला सुद्धा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले.
प्रियकरासाठी अल्पवयीन प्रेयसी बनली चोर.
रविवार, फेब्रुवारी ०७, २०२१