(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- नेहरू युवा केंद्र युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकारच्या वतीने भद्रावती तालुक्यातील चरूर (घा)येथील विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ व कोकेवाडा (मा.)येथील सिद्धिविनायक बाल गणेश क्रिडा मंडळ यांना नुकतेच क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा युवा समन्वयक शमसेर सुभेदार, लेखापाल डुबे, मारोती बोबाटे, सोनाली सोनारकर, मंडळाचे अध्यक्ष महेश केदार ,सचिव अमोल दडमल, कपिल मानकर, अंकित मानकर, नेहरू युवा केंद्राचे भद्रावती तालुका राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आशिष हनवते उपस्थित होते.