यवतमाळ:- पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्यामुळे १२ चिमुकल्यांची प्रकृती बिघडली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणामुळे पाच वर्षांखालील चिमुरड्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे रविवारी (दि. ३१) पोलिओ लसीकरणावेळी हा प्रकार घडला.
लहान मुलांना पोलिओच्या डोसऐवजी सॅनिटायजर पाजले. १२ लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. १ ते ५ वर्षे वयोगटातील ही लहान मुलं आहेत. सुरुवातीला या मुलांना उलट्याचा त्रास सुरु झाला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
जिल्हाधिकारी एम देवेन्द्र सिंग यांनी रविवारी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ घटनेची चौकशी करत आहेत.