Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स गोंडपिपरी येथे मराठी राज्यभाषा गौरव दिवस संपन्न.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स गोंडपिपरी येथे कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतनिमित्त मराठी राज्यभाषा गौरव दीन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. ए. निखाडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रा. श्री. शरद लखेकर, मराठी विभागाची प्राध्यापिका प्रज्ञा वसू हे उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या प्रास्ताविक भाषणातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा जागतिक दर्जा मिळावयास हवा असे मत प्राध्यापिका प्रज्ञा वसू यांनी मांडले तर मराठी भाषेचे महत्व , मराठीचे संगोपन आणि संवर्धन या विषयावर प्रा. शरद लाखेकर यांनी आपले मत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषा ही भारताबाहेरील इतर ही देशात शिकविली जाते म्हणून तिचा आपल्याला मान, संगोपन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सी. ए. नीखडे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी ऋतिक तावाडे , शील मुंजणकर , आशिष फुलझेले यांनी मराठी भाषा संवर्धन आणि संगोपन याविषयावर आपले मत व्यक्त केले, तसेच पपिता शेडमाके हिने मराठी भाषेवर शृंगार गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी आशिष सिडाम तर प्रास्ताविक प्रा.प्रज्ञा वसु यांनी केले. आभार प्रदर्शन शील मुंजमकर याने केले.
या प्रसंगी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने