कोरपना:- आज शनिवार (२७ फेब्रुवारी २०२१) ला सकाळी आपल्या वडिलांचे घर जाळून मुलाने स्वतः विष घेतल्याची घटना घडली. रामा मारोती पेंदोर ( 30 ) रा. इंजापूर असे अत्यवस्थ असलेल्या मुलाचे नाव आहे
सकाळच्या सुमारास मुलगा रामा पेंदोर याने वडील मारोती पेंदोर यांच्याशी इंजापूर येथे भांडण केले. वडीलाला जीवे मारण्यासाठी तो हातात कुऱ्हाड घेऊन फिरत होता. दरम्यान, आसन खुर्द येथे येऊन मुलाने रागाच्या भरात वडिलाचे घराला आग लावून पेटवून दिले. यात घर जळून, सर्व वस्तू साहित्य भस्मसात झाले. गावापासून दूर असल्यामुळे आग सर्वत्र पसरली नाही. त्यानंतर अग्निशमन वाहनाला बोलविण्यात आले तोपर्यंत घर जळून गेले होते. सुरू असलेली आग आग विझविली.
प्राप्त तक्रारीवरून गडचांदूरचे ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा आरोपी कुऱ्हाड हाती घेऊन होता. त्याने उंदीर मारायचे केक खाल्याचे दिसून आले. लगेच दुपारी 2 वाजता पोलिसांनी त्याला उपचारासाठी गडचांदूर येथे नेले. आरोपी रामाच्या भीतीने आईवडील इंजापूर गाव सोडून आसन खुर्द येथे मागील दोन वर्षे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करित होते. तरीही तो मारहाण करित असल्याचे वडिलांनी सांगितली.