Click Here...👇👇👇

नोकारी खुर्द येथे आयोजित केलेले कब्बडीचे खुले सामने संपन्न.

Bhairav Diwase
प्रथम क्रमांक बीबी ने पटकविला.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- वर्ष भराच्या लॉक डाऊन च्या काळात सर्वत्र ठप्प पडलेले मैदानी खेळ हे कोरोना च्या प्रादुर्भावामुळे बंद पडले होते राज्यस्तरीय आयोजित खेळ असो की जिल्हास्तरीय पातळीवर असलेले किव्हा विभाग स्तरावर आयोजित होणारे मैदानी खेळ वर्ष भर बंद होते पण आता हळू हळू कोरोंना कमी होऊन जानेवारी 2021 पासून सर्वत्र क्रीडा विभाग सुरू झालेला आहे.


          त्यातलाच एक भाग म्हणून नोकारी खुर्द गावात खुल्या कब्बडी सामन्याचे आयोजन केले होते आणि अतिशय सुरळीत कब्बडी चे सामने पार पाडले यात पथम क्रमांक बीबी या गावाने तर दुसरा क्रमांक माजरी तृतीय क्रमांक सोनापूर चौथा क्रमांक नोकरी ने पटकविला यात सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
          
         या स्पर्धेला सर्व गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले तसेच आयोजन करणारे युवा मित्र बंधू यांनी  तरुण युवा विद्यार्थांना संघटित करून जोश निर्माण करणारे काम केले या  मारोती भाऊ येरमे, गुलाब पेंदोर, रोहित राऊत, अनिल परचाके, प्रकाश किंनाके तसेच इतर सर्व सहकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे या छोट्या गावात कब्बडी सामन्या करिता एकूण अनेक गावातून 40 च्या जवळपास संघ आले कुठल्याही प्रकारचे एकमेकात वाद न होता सुरळीत सामने पार पडले हे सर्व घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणारे पंच अनिल परचांके, रोहित राऊत, गुलाब पेनदोर तसेच इतर सर्व पंच यांचे मंडळातर्फे मनःपूर्वक आभार मानले या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमाचे सूत्र संचालन युवा विद्यार्थी तिलक पाटील यांनी केले.
         
         गावात झालेल्या सामन्याचे सर्व जवळपासच्या गावकऱ्यानि आनंद घेतला बक्षीस वितरण करण्याकरिता विशेष देणगी देणारे गावचे  सुपुत्र मा. श्री गिरिधर पेन्दोर ( Police Sub Inspector PSI), अनिल पेंदोर( पोलिस ), सुनील पराचाके  (पोलिस) निखिल गेडाम (वनरक्षक) दशरथ मोहित्कर. व्यापारी जस्मित राठोड तसेच इतर सर्व बक्षीस देणगी करिता सर्व सहकाऱ्यांचे मंडळातर्फे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक तिलक पाटील यांनी आभार मानले.