Top News

ग्रामपंचायत चिखली खुर्द अंतर्गत पाटागुडा येथिल सिमेंट काँक्रिटच्या रॉपटरची फक्त थुकपालिस.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- अतिदुर्गम व अविकसित समजणारा जिवती तालुक्यातील चिखली खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने पाटागुडा येथे सिमेंट काँक्रिट रॉपटरचे काम राजाराम रानबा तोगरे व सुभाष केरबा तोगरे यांच्या घराजवळ सिमेंट कॉंक्रीट रॉपटरचे काम पुर्ण झाले असून काम निकृष्ट दर्जाचे झाले, असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत.या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी गावातील नागरिक करताना दिसत आहे.


       सिमेंट काँक्रेट रॉपटर ठरल्याप्रमाणे केला गेला नाही तसेच या रॉपटरची फक्त थुकपालीस झाली आहे याबाबत काही ग्रामस्थांनी ग्रामसेवक,सरपंच यांच्या कडे तोंडी तक्रार केली तसेच इंजिनियर यांच्यासोबत दूरध्वनीवर फोन केला असता त्यांनी सुद्धा उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. ग्रा पं चिखली खुर्द येथे विविध योजनेतून काम होते आहे. रस्त्यामुळे गावांच्या विकासालाही सजग दृष्टी प्राप्त होतो पण ग्रामसेवक,सरपंच, ठोकेदार, इंजिनियर, व बि.डि.ओ यांच्या मनमानी कारभार सुरू आहे.
       
       तसेच ग्रामसेवक, सरपंच, इंजिनियर, बि.डि.ओ हे अधिकारी ठोकेदार कडून पैसे घेऊन गावातील कामे निकृष्ट दर्जाचे करीत असे अशा आरोप सुध्दा ग्रामस्थ करताना दिसत आहे, यामुळे गाव विकासालाही चालना मिळात नाही आहे, असे चित्र ग्रा पं चिखली खुर्द येथे दिसत आहे. चिखली खुर्द ग्रामपंचायत कडे अनेक लोकप्रतिनिधीकडून व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

      ग्रामस्थ आमच्या प्रतिनीधी सोबत बोलताना म्हणाले अशा अधिकारावर गुन्हा नोंद करुन यांना पदावरून निळबित करण्यात यावे अशें न झाल्याल बि.डि.ओ, इंजिनियर, ग्रामसेवक,यांच्या ऑफिस मध्ये जाऊन सुतळी बाम्म फोडो आंदोलन करण्यात येईल अशा इशारा दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने