🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

सावली येथील आयटीआय च्या विध्यार्थ्यांसाठी विशेष परिवहन बस सेवेची मागणी.

Bhairav Diwase. Feb 04, 2021
सावली:- सावली येथील आयटीआयच्या विद्यार्थ्यासाठी विशेष परिवहन बस सेवा सुरू करण्याची मागणी पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयामार्फत आयटीआयतील प्रशिक्षणार्थी यांनी परिवहन व्यवस्थापक गडचिरोली यांना निवेदन देत केली आहे.

सावली येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्यात आले आहे. या संस्थेत ग्रामीण भागातील एकूण २५० ते ३०० प्रशिक्षणार्थी विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. तसेच कर्मचारी देखील आहेत. या प्रशिक्षणार्थीचा प्रवास सोयीसाठी व्हावा यासाठी या मार्गावर या आगोदरच परिवहन उपक्रमाकडून परिवहन बससेवा सुविधा देण्यात आली होती. कोरोना महामारीमुळे एप्रिल २०२० पासून हि बससेवा बंद करण्यात आली आहे.

नवीन वर्षात १ जानेवारी पासून प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण नियमित सुरू झाले असल्याने शालेय विद्यार्थ्यांना व प्रशिक्षणार्थीच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी ९:३० व सायंकाळी ५:००वा. या मार्गावर परिवहन बस सेवा सुरू करणे आवश्यक असल्याने आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीची गैरसोय होत आहे. 
अंतरगाव, निफन्द्रा,गेवरा,निमगाव,बेलगाव,डोंगरगाव परिसरातील जवळपास ४०ते५० विद्यार्थी शायकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावली येते प्रशिक्षण घेत आहेत. संस्थेच्या सुट्टी होण्याची वेळ सायंकाळी ५ वाजताचा आहे मात्र ग्रामीण भागात जाणारी सायंकाळची कुठलीही बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी परतण्यासाठी रात्र होत आहे. व शिक्षण अर्धवट सोडून जावे लागत आहे. यामुळे प्रशिक्षणार्थ्यांचे शिक्षण वाया जात आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून पालकमंत्री जनसंपर्क कार्यालय व्याहाड मार्फत ग्रामीण भागातील आयटीआय चे प्रशिक्षणार्थी यांनी आगर प्रमुख,परिवहन व्यवस्थापक गडचिरोली यांना निवेदन देऊन बसची मागणी करीत आहेत.