🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील कोंढा गावात आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना रोज शनिवारला घडली. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

      सुनील घूगूल वय 35 वर्ष राहणार जुना कोंढा असे आरोपीचे नाव आहे. कोंढा येथील महिला आपल्या दोन मुलींसह माहेरी आली असता काही कामानिमित्त बाहेर गेली होती. याच संधीचा फायदा घेऊन शेजारी राहणाऱ्या आरोपीने आठ वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून तिचेवर अत्याचार केला. ही बाब घाबरलेल्या पीडित मुलीने आई येताचं तिचे जवळ सांगितली. या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात देताच ठाणेदार सुनील सिंग पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लगेच आरोपीचा शोध घेण्यासाठी कोंढा गावात गेले असता, आरोपी पसार झाला होता. आरोपीचा शोध चालू असून त्याच्यावर अत्याचार व पास्को चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.