🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

कोरोना सारख्या जागतिक संकट काळाशी संघर्ष करून सरकारचे जनहितकारी अर्थसंकल्प:- हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री.

Bhairav Diwase. Feb 01, 2021
चंद्रपूर:- कोरोना सारख्या जागतिक संकट काळाशी संघर्ष करून केंद्र सरकारने जनहितकारी, सर्वसमावेशक व सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे, या अर्थसंकल्पाचा नक्कीच सर्व स्तरातून स्वागत होईल असा विश्वास पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला आहे. 
      कोरोना लसीवर २०२१- २२ या वर्षात ३५००० कोटी रुपये खर्च होणार होणार असून गरज पडल्यास अधिक निधी सरकार उपलब्ध करून देणार आहे. देशातील शेतकरी हा आर्थिक बळकट व समृद्ध असला पाहिजे हे मोदी सरकारची प्राथमिकता असून खराब होणाऱ्या २२ पिकांचा समावेश ऑपरेशन ग्रीन स्कीम मध्ये करण्यात आला आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी पर्यंत आता कृषी उत्पन्न बाजार समिती ची पर्यंत पोहचेल. कोरोना लॉक डाऊन काळात जवळपास ८० कोटी जनतेला मोफत धान्य उपलब्ध करून देखील असा बळकट अर्थसंकल्प सादर करणे म्हणजे सरकारची फलश्रुतीच आहे असे गौरवोद्गार हंसराज अहीर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना काढले. 
    महिला सक्षमीकरण व सशक्तीकरण यावर केंद्र सरकारचे विशेष लक्ष असतांनाच उज्वला योजनेचा लाभ १ करोड महिलांपर्यंत पोहचविण्याचे लक्ष या अर्थसंकल्पातून मांडण्यात आले आहे. मत्स्य व्यवसायींना अधिक समृद्ध करण्यासाठी व त्यांना मासेमारीच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोच्ची, चेन्नई, विशाखापटणम, पारादीप, पेटुआघाट असे ५ नवीन फिशिंग हार्बर तयार करण्यात येणार असल्याने देशात स्वयंरोजगाराचे नवीन दालन मत्स्य व्यवसायिंकांना उपलब्ध होणार असल्याचे समाधान हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. 
      वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा व आरोग्य सुविधा यावर विशेष भर देण्यात आला आहे. पारदर्शकता हि या अर्थसंकल्पाची महत्वाची बाजू असतांना देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत असतांना ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना आता इन्कम टॅक्स फाईल करण्याची गरज नाही हि जेष्ठ नागरिकांना समाधानकारक बाब आहे असेही यावेळी अहीर यांनी सांगितले.  
   मिशन पोषण २.०, शहरी भागातील जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना, इंटीग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन पोर्टल, असे अनेक महत्वाकांक्षी योजना या अर्थसंकल्पात असून सर्वसमावेशक व देशाला आर्थिक बळकट करणारा अर्थसंकल्प असल्याचा विश्वास पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना व्यक्त केला.