Top News

जूनगावात सरपंच पदाचे चार दावेदार; राहुल भाऊ पाल यांचा कुणाला आशीर्वाद?

Bhairav Diwase. Feb 03, 2021
पोंभूर्णा:- तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. परंतु सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेले नव्हते. त्यामुळे सर्वांच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागल्या होत्या. आता ही प्रतीक्षा संपली असून गावचा कारभारी कोण होणार याची उत्सुकता लागलेली आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव येथे सरपंच पद हे सर्वसाधारण महिला करिता राखीव झाल्याने निवडून आलेल्या चार महिलांपैकी कोण सरपंच होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात येथील ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यात आली. तीन महिला बिनविरोध निवडून आल्या होत्या. झालेल्या निवडणुकीत एक महिला विजयी झाली. सात पैकी सातही जागा जिंकून राहुल भाऊ यांनी गावात नव्हे तालुक्यातच एक नवा इतिहास रचला. चार महिला सदस्य व तीन पुरुष सदस्य अशा एकूण सात सदस्यांच्या ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी चारही महिला इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येथील सरपंच पदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मात्रयेथील हाय कमांड असलेले राहुल भाऊ पाल हे कुणाच्या गळ्यात सरपंच पदाची माळ घालतात याकडे नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत.



जुनगाव येथे एक ते चार वार्ड असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वार्ड क्रमांक दोन व एक मधून तीन महिला आधीच निर्विरोध निवडून आल्या.उर्वरित चार जागांसाठी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत राहुल पाल, विष्णू भाकरे, तेजपाल रंगारी, पुनम राहुल चुधरी, सोनी चंद्रकांत चुधरी, माधुरी प्रकाश झबाडे, पल्लवी किशोर चुधरी हे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
जूनगाव येथील सरपंचपदाची निवडणूक 12 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याने आता राहुल भाऊ पाल हे 12 तारखेला गावचा कारभारी म्हणून कोणाची निवड करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने