वरोरा:- वरोरा तालुक्यातील कळंगाव्हाण येथे सोयाबीन काढताना मळणीयंत्रात अडकून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. 15 फेब्रुवारी दुपारी 1:00 वाजेच्या सुमारास घडली.
बोर्डा येथील युवक गोलू चौधरी (27) हा मळणीयंत्रावर रोजंदारीने काम करत होता. ट्रॅक्टरला मळणीयंत्र जोडलेले होते. गोलू सोयाबीन मळणीयंत्रातून काढत असताना त्याच्या हात अचानक यंत्रात अडकला, आणि तोल गेल्याने त्याला मळणीयंत्रात ओढून घेतले. यावेळी गोलू चौधरी यांचा मळणीयंत्रात अडकून मृत्यू झाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा केला. याप्रकरणी वरोरा पोलीस तपास करीत आहे.