Top News

भागवत सप्ताहात ओबीसी जनगणना याबाबत जनजागृती.


Bhairav Diwase.      Feb 04, 2021
भंडारा:- जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील खैरी (दिवाण) या गावात यूथ फॉर सोशल जस्टिस (YSJ) या सामजिक संघटनेकडुन भगवत सप्ताहात OBC जनगणनेबाबत जनजागृती करण्यात आली.
   

   यूथ फॉर सोशल जस्टिस ( YSJ) या सामजिक संघटनेकडुन मागील ऐक महिन्यापासून ओबीसी जागवा, ओबीसी चेतवा या उपक्रमा अंतर्गत ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना याबाबत जनजागृती केल्या जात आहे. यात सकाळी मॉर्निग वॉक करणारे यांना भेटून obc प्रवर्गाची जनगणना याबाबत माहिती दिली जाते तसेच भंडारा शहरातील प्रत्येक घरापर्यंत जावून याबाबत ची माहिती दिली जाते. तसेच प्रत्येक घराला 2021 च्या जनगणनेत obc चा कॉलम नाही म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही अश्या स्वरूपाचा स्टिकर सुध्दा लावले जातात.
    

  या जनजागृती करण्याच्या माध्यमातून आज पवनी तालुक्यातील खैरी (दिवाण)या गावात भागवत सप्ताहात OBC जनगणना याबाबत जनजागृती करण्यात आली. यात obc प्रवर्गाच्या जनगणना झाली तर obc प्रवर्गाचे कोणते फायदे  होणार हे सांगण्यात आले. तसेच आजपर्यंत obc प्रवर्गाची वेगळी जनगणनना झाली नाही तर त्याचे आजपर्यंत झालेले नुकसान यावर देखील मार्गदर्शन करण्यात आले आणि जर 2021 च्या जनगणनेत obc चा कॉलम नसेल तर जनगणनेत आमचा सहभाग नाही अशी भूमिका देखील मांडण्यात आली.
             
        यावेळी यूथ फॉर सोशल जस्टिस या सामजिक संघटनेचे आदित्य जीभकाटे, हर्षल भुरे, अनिकेत जनबंधू,मोनू पंचभाई, स्नेहल शहारे,अमोल पागोटे,अनिकेत सावरबांधे,विक्की सावरबांधे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने