Click Here...👇👇👇

मराठी भाषा गौरव दिनानिमित्य विविध स्पर्धेचे आयोजन.

Bhairav Diwase

शब्दांकूर फॉउंडेशन चंद्रपूरचा स्तुत्य उपक्रम.

Bhairav Diwase.       Feb 23, 2021

चंद्रपूर:- दरवर्षी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून मोठया उत्साहात साजरी केल्या जाते.या दिनाचे औचित्य साधून नोंदणीकृत असलेली एक सामाजिक संस्था शब्दांकूर फौंडेशन,चंद्रपूर या संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

         चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद,खाजगी व विविध आस्थापनातील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा,निबंध स्पर्धा व सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या विविध स्पर्धा वर्ग ४ते ७ व वर्ग ८ वी ते १२ अशा दोन गटात घेण्यात येणार आहेत. पोस्टर स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी "गौरव मराठीचा" हा विषय देण्यात आलेला आहे तरी या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी तानाजी अल्लीवार सर मो. नं.९५११६४४८५८ या क्रमांकावर पाठविण्यात यावे. तसेच निबंध स्पर्धेसाठी देखील इयत्ता ४ ते ७ करीता "माझी मायबोली मराठी" हा विषय असून निबंध स्वलिखित असायला हवा व शब्दमर्यादा ५०० असायला हवी तसेच इयत्ता ८ वी ते १२ वी साठी विषय "मराठी भाषेचे संवर्धन-काळाची गरज" हा विषय असून त्याची शब्दमर्यादा १००० आहे.तरी सर्व स्पर्धकांनी निबंधाचे पी.डी. एफ किंवा फोटोकॉपी या स्वरूपात राजेश्वर अम्मावार सर मो.नं. ९०४९२०४१६४ या क्रमांकावर पाठविण्यात यावे.

               
       प्रश्नमंजुषा ही स्पर्धा गुगलफॉर्म द्वारे घेण्यात येणार असून दिलेल्या लिंकच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.काही अडचण असल्यास स्पर्धा प्रमुख  किशोर चलाख सर मो. नं. ९४०५९००९८७  यांच्याकडे संपर्क साधावा. या आयोजित स्पर्धेत सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहन शब्दांकूर फौंडेशनचे दुशांत निमकर,किशोर चलाख,राजेश्वर अम्मावार,सौ उषा निमकर,राकेश शेंडे,प्रशांत खुसपुरे,आशिष ढवस इत्यादी पदाधिकाऱ्यांनी  केले आहे.