Top News

सिंदेवाही तालुक्यातील ठाणेदार आले मदतीला धावून.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही येथील एक अत्यंत गरीब कुटुंब राहायला घर बरोबर नाही शासकीय उदासीनतेमुळे घरकुल पण अर्धवट आहे. पोत्याच्या फळ्या गुंडाळून हा परिवार मिळेल ते काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.अश्या परिस्तिथीत पोटच्या पोरींचे लग्न जवळ येऊन ठेपले.
कुमारी ज्योत्स्ना चे लग्न 25 फेब्रुवारी ला ठरले आहे.हळूहळू काही काळ लवकरात लवकर निघून जात आहे.कुटुंबावर लग्नाची जबाबदारी येऊन पोहचली आहे. डोक्यात लग्नाबद्दल विविध विचार भ्रमण करीत आहे.सगळं कुटुंब
लग्न कसे करावे या विवंचनेत असतांना ऐनवेळी
या परिवारास सिंदेवाहीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री योगेश घारे साहेबांनी मदतीचा हात दिला. ज्योत्स्नाची डोळ्या देखत परिस्थिती पाहून, आर्थिक मदत दिली.
घारे साहेबांच्या अचानक गृह भेटीने हा परिवार पूर्णपणे भारावून गेला.

घारे साहेबांना या गरीब मुलीच्या लग्नाची आणि आर्थिक परिस्थिती ची माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या परिवारातील घटक समजून एका भावाची भूमिका ही राजरोसपणे पार पाडलेली आहे.
वास्तविकता बघता सर्वांनाच पोलिस कडक आणि रागीट स्वभावाचे असतात असे  वाटते पण या शिस्तप्रिय स्वभावा मागे पण एक हृदय स्पर्शी व्यक्तिमत्त्व असते याची प्रचिती आज घारे साहेबांच्या मदतीने व नकळतपणे कुटूंबियांची भेट घेऊन त्यांना प्रफुल्लित केल्याने पुन्हा समोर आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने