🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

वेकोली प्रशासनाच्या विरोधात कॉलरीतील नागरिकांचे रस्ता रोको.

युवा सेनेचे पाठींब्यासाठी सक्रिय सहभाग.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:-    सततच्या ब्लास्टिंगमुळे घरांना गेलेली तड्यांमुळे वेकोली प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष व वसाहतीत विज वितरण कंपनीतर्फे तोडन्यात आलेले विज कनेक्शन यामुळे संतप्त झालेल्या माजरी येथील वेकोली वसाहतीमधील वेकोली प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून रस्ता जाम आंदोलन करीत नागरिकांनी दि.18 फेब्रुवारी ला आपला रोप व्यक्त केला. या आंदोलनाला युवा सेनेने सक्रिय पाठींबा देत रस्ता रोकोमध्ये सहभाग नोंदविल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते.
   
   दरम्यान या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात यावे यासाठी सामाजिक कल्याण तथा मानव संरक्षण संघाच्या माजरी शाखेतर्फे खासदार बाळू धानोरकर व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. वेकोलीच्या माजरी ओपन कास्ट खाणीत करण्यात येत असलेल्या सततच्या स्फोटमुळे वसाहतीतील अनेक घरांना तडे जाऊन नागरिक असुरक्षित झाले आहे. याच क्षेत्रातील शाळेच्या ईमारतीलाही या स्फोटाचा परिणाम झाला असून ईमारतीला भेगा पडल्यामुळे येथे शिकणाऱ्या 400 विद्यार्थांना जिविताला धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे वेकोली प्रशासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही त्याचप्रमाणे वसाहतीतील महाजन नगरातील  घरांची विज विजवितरण कंपनीकडून तोडण्यात आली आहे. या वसाहतीत विज गेल्या 15 दिवसांपासून बंद करण्यात आल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. या समस्या लवकरात निकालात न काढल्यास याविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांनी दिला आहे. 
       सदर आंदोलन जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, युवा सेनेचे रुपेश कदम, जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
        आंदोलनात युवासेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे, तालुका प्रमुख महेश जीवतोडे, माजरी शहर अध्यक्ष तथा ग्राम.पं. सदस्य सरताज सिद्धीकी यांच्या नेतृत्वात युवा सेनेचे  ग्राम पं.सदस्य राकेश दोंतावार, ग्राम पं.सदस्य तहेरा बेगम, रोहित येदुवंशी, सुनीता यादव, शांती प्रजापती, रीना उपाध्याय, सीमा भारती, किरण सिंग, शाहिदा बानो, गुंजलिया केवट, गीता केवट, साजदा बानो, माधवी सरकार, जमीला बेगम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला तथा शेकडो नागरिक सहभागी झाले होते.