🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

प्रेमीयुगलांची विष प्राशन करून आत्महत्या.

अनिकेत पाटील आणि सानिका व्हनाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू.
Bhairav Diwase.       Feb 18, 2021
कोल्हापूर:- एकाच गावातील तरुण आणि तरुणीने एकाच दिवशी दोन  वेगवेगळ्या ठिकाणी विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. करवीर तालुक्यातील चुये या गावात ही घटना घडली आहे. लग्नासाठी कर्ज व्हायला नको, यासाठी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख तरुणीने चिठ्ठीत केला आहे. अनिकेत गोविंद पाटील (वय 21) आणि सानिका भीमराव व्हनाळकर (वय 18) अशी मृतांची नावे आहेत.

अनिकेत पाटील याने चुये येथील राहत्या घरी विषप्राशन केले, तर सानिका हिने आर. के. नगर येथे नातेवाईकांच्या घरी विषप्राशन केले. अनिकेतवर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला, तर सानिका हिचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. 

दरम्यान, प्रेमाला विरोध झाल्याने दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू होती. तर 'लग्नासाठी कर्ज व्हायला नको. मला आता सहन होईना झालंय, म्हणून आत्महत्या करत आहे.' असा उल्लेख तरुणीने चिठ्ठीत केला आहे.

(व्हायरल स्टेट्स व्हिडिओ (फोटो))


सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओ मध्ये "आपला प्रियकर क्रिकेट खेळताना ह्रदय विकाराचा झटका आल्यानंतर मरण पावला हे समजल्यावर स्वतःचा जिव देणारी एक खरी प्रेमिका या जगात अजूनही मिळु शकते. भावपूर्ण श्रद्धांजली" अस मजकूर लिहीण्यात आला आहे. परंतू मजकूर हा चुकीचा लिहीण्यात आला आहे. सानिका आणि अनिकेत यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली.

क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळताना फलंदाज बाबू नलावडे वय वर्ष 47 हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जो मजकूर आहे तो चुकिचा असल्यामुळे हा चुकीचा व्हिडिओ कुणीही फारवर्ड करु नये असे आवाहन आधार न्यूज नेटवर्क तर्फे करण्यात येत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत