🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

मिरची तोडण्याकरीता मजूरांचे तेलंगणात स्थलांतर.


Bhairav Diwase.        Feb 09, 2021
मुल:- ग्रामीण भागातील निवडणुकीची धामधूम संपताच, गावखेड्यातील मतदारांना पोटाची चिंता भेडसावत आहे. पोटाची खळगी भरण्याकरिता मूल तालुक्यातील चिरोली,  भेजगाव व आजुबाजुच्या परिसरातील मजुरांचे लोंढेच्या लोंढे मिरची तोडण्याकरिता तेलंगणातील खमम जिल्ह्यात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न आजही ग्रामीण भागात सतावत असल्याचे चित्र दिसून येते आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मजूर परराज्यात अडकल्याने त्यांचे चांगलेच हाल झाले. ऐन गावाकडे परतण्याच्या वेळेवरच कोरोनाने कहर केल्याने प्रशासनाला लाॅकडाऊन करावा लागला. परिणामी, मजूर मिळेल त्या साधनाने तर काहींनी पायी प्रवास करीत गाव गाठले. गावात आल्यावरही कुटुंबापासून दूर राहावे लागले.
या वर्षीही मजूर वर्ग रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर होत आहे. या वर्षी प्रवासाची साधने पूर्णतः सुरू झाली नसल्याने मजुरांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. तेलंगणातील शेतमालकच मजुरांना नेण्यासाठी मालवाहू गाड्या पाठवित आहेत, तर काहींनी रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण करून मजुरांचे स्थलांतर सुरू केले आहेत. यामुळे गावेच्या गावे ओस पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.