🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

प्रेमदिवसाच्या आठवड्यातच प्रेमीयुगलांची गळफास घेऊन आत्महत्या.

Bhairav Diwase.     Feb 08, 2021
गडचिरोली:- 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे हा दिवस म्हणजे प्रेमाचा, या दिवशी अनेक आपलं प्रेम एकमेकांसमोर व्यक्त करतात मात्र व्हॅलेंटाईन दिवसाच्या आठवड्यातच प्रेमीयुगलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उजेडात आली.

        गडचिरोली जिल्ह्यातील युवक आणि भंडारा जिल्ह्यातील युवती यांचे प्रेमसंबंध जुळले, मात्र सोमवारी अचानक या प्रेमीयुगलाने गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली.

       प्रेमाचा अंत लग्नात व्हावा मात्र घरच्यांना हे लग्न मंजूर होणार नाही. यामुळे त्या युगलानी आत्महत्या केली असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

23 वर्षीय लिकेश भेंडारे, 19 वर्षीय किरण नंदनवार अशी त्या प्रेमी युगलांची नावे आहेत. लिकेश हा धानोरा येथे रोजंदारी चे काम करायचा, तर किरण ही नातेवाईकांकडे रहायची, गेल्या वर्षी किरण ही 12 वी उत्तीर्ण झाली होती, त्यानंतर ती स्थानिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती.
धानोरा येथे आधी दोघांची ओळखी व प्रेम बहरू लागले मात्र ही बाब घरच्यांना माहिती नव्हते. 

सोमवारी किरण कॉलेजला जातो म्हणून घराबाहेर निघाली, मात्र संध्याकाळ झाली तरी किरण घरी परतली नाही. यामुळे घरच्यांनी किरण चा शोध घेतला, या दरम्यान लिकेश व किरण मधील प्रेमसंबंधाबद्दल असल्याची माहिती घरच्यांना मिळाली. त्यामुळे किरण च्या घरच्यांनी लिकेशची खोली गाठली, खोलीत प्रवेश करताच कुटुंबातील सदस्यांची पायाखालची जमीनच सरकली.

त्या खोलीत दोघांचा मृतदेह गळफास अवस्थेत लटकलेल्या अवस्थेत होता. आत्महत्येपूर्वी लिकेशने किरणच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिला पत्नी म्हणून स्वीकारले होते.