Top News

नागपूर येथे पार पडला ३३ अन्यायग्रस्त जमातींचा भव्य कर्मचारी मेळावा.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- दि. १४ फेब्रुवारी २०२१ ला ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्यूमन(ऑफ्रोह) महाराष्ट्र संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रम म्हणजे संघटनेचे राज्यध्यक्ष शिवानंद सहारकर यांच्या अध्यक्षखाली कविवर्य सुरेश भट सभागृह;रेशीमबाग नागपूर येथे संपन्न झाला.

               कार्यक्रमात हलबा, हलबी, माना, गोवारी, धनगर, धनवर, धनगढ, मन्नेरवारलू, मन्नेरवार, कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी; ठाकूर; ठाकर; धोबा; राज; पावरा; गोंड; राजगोंड; पावरा अशा 33 जमातीच्या राज्यातील शासकीय; निमशासकीय; महामंडळ; केंद्र शासकीय अधिकारी कर्मचारी भंडारा; गोंदिया; गडचिरोली; चंद्रपूर; वर्धा; यवतमाळ; वाशिम; अमरावती; अकोला; बुलढाणा;नांदेड; परभणी; बीड; जालना; पुणे; कोल्हापूर; जालना; अहमदनगर; ठाणे; कल्याण; औरंगाबाद; रत्नागिरी; रायगड; लातूर; उस्मानाबाद; सातारा; सांगली इ. जिल्ह्यातून सहभागी झाले.        

              कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार राजू पारवे व आमदार अभिजित वंजारी;ऍड शैलेश नारनवरे; ऍड सुशांत येरमवार; मा. बी. के. हेडाऊ उपस्थित होते.

              डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची पूजाव दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक राजेश सोनपरोते कार्याध्यक्ष यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा व्यथा व संघटनेचा वर्षभराचा प्रवास सांगितला. कार्यक्रमा दरम्यानश्री मुरलीधर सोनकुसरे सेवानिवृत्त कर्मचारी; श्रीमती करुणा भानुसे सेवासमाप्त कर्मचारी; मृत कर्मचाऱ्यांचे विधवा भारती झोडे;   सेवेत पुन्हा रुजू झालेली शिक्षिका प्रमिला बांगडे यांच्या वेदना व्हिडीओ च्या माध्यमाने दाखविण्यात आल्या.     अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुढील अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन आमदार अभिजित वंजारी यांनी दिले. तर अभ्यासगटाचे अध्यक्ष मा.नामदार छगन भुजबळ यांचेशी चर्चा करण्यास येत्या 15 दिवसात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जाईल असे आश्वासन आमदार राजू पारवे यांनी दिले. महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त 33 जमातीचे बांधव मनाने एकत्र आले ही आजच्या कार्यक्रमाची मोठी उपलब्धी आहे. नेते मताची बेरीज वजाबाकी करतात. कोणत्या कार्यक्रमात गेल्याने आपले मताचे गणित बिघडेल याची काळजी घेतात. त्यामुळेच कार्यक्रमात मोठ्या नेत्यांची उपस्थित नसावी. मात्र मी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देत असतो त्यामुळेच कार्यक्रमाला उपस्थित झालो हे आवर्जून सांगितले.
             
              ऍड. शैलेश नारनवरे यांनी आपली बाजू कायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टाचा जगदीश बहेरा केसचा निकालाचा चुकीचा अर्थ काढून शासन अंमलबजावणी करीत आहे. संविधानातील कलम१४ चा भंग होत आहे. उच्च न्यायालयात ३१४०/२०१८ ची केस अंतिम सुनावणीस आली आहे. अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांची बाजू कोर्टात भक्कमपणे मांडू असे सांगितले.

               ऍड सुशांत येरमवार यांनी कायदेशीर बाबीवर बोलतांना अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा सर्व केसची सुनावणी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात होणार आहे. त्यात बरेच कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्याची संधी मिळालेली आहे. त्या संधीचे सोने करू असे म्हटले. मा. बी. के. हेडाऊ यांनी अधिसंख्य पदाची शासनाची व्याख्या सांगितली. जात पडताळणी समित्याना जातीचे प्रमाणपत्र तपासायचे असते परंतु ते जात तपासतात. जात पडताळणी समित्या मध्ये कुणीही संशोधन अधिकारी नाही. माधुरी पाटील केसच्या निकालात दिलेल्या निर्देशानुसार समिती नाही ही माहिती दिली.

              ऑफ्रोह संघटनेच्या लढा न्यायचा स्मरणिकेचे विमोचन आमदार राजू पारवे यांच्या हस्ते करण्यात आले.                शिवानंद सहारकर यांनी अध्यक्षीय भाषणात ऑफ्रोह चे संघटन सर्व जिल्ह्यात मजबूत करण्यात येईल. कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी अन्यायग्रस्त समाज बांधवांनी एकत्रित येऊन लढावे.त्याकरिता ऑफ्रोह चे व्यासपीठ सर्वांसाठी खुले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अधिसंख्य ठरवून मागील 1वर्षांपासून पेंशन व इतर लाभ देण्यात आले नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या 15 दिवसात जर शासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची पेंशन व इतर लाभ दिले नाही तर १मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनात संघटना आंदोलन तीव्र करेल. नागपूरला स्वतः १मार्च पासून आमरण उपोषण करणार असल्याची ग्वाही दिली.

               कालच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ऑफ्रोह नागपूर जिल्हा कार्यकारणीने केले.  नागपूर जिल्हाध्यक्ष दामोधर; खडगी; उपाध्यक्ष मधू पराड मॅडम; सचिव नरेंद्र निमजे; कोषाध्यक्ष अनुराग बोकडे; कार्यध्यक्ष प्रवीण मदनकर;सदस्य दिलीप भानुसे; भोजराज पात्रे; विनेश डेकाटे; लिलाधर बारांगे; कविता नंदनवार; ममता गाडगे; विलास उरकुडे; अविनाश वरूडकर; चंद्रशेखर भिसिकर;

               धनविजय साटकर; धर्मदास लिखार;मधुकर टेकरे;विजय कामिलकर;विजय टाकळीकर;विजय पौनिकर;संजय नंदनकर; रामेश्वर भगत;राजेश देशकर; स्मिता हेडाऊ; मार्गदर्शक रामचंद्र खोत; सल्लागार शांताराम निनावे यांनी अथक परिश्रम घेतले.

                कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधु पराड व मनोज जुनोनकर यांनी केले. दिलीप भानुसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने