चंद्रपूर:- वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. भाजप नेत्यांसाठी नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
अखेर वनमंत्री संजय राठोडांनी मातोश्री वर राजीनामा पाठवला?
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन योग्य केले. लवकरच याप्रकरणातील सत्य बाहेर येईल, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.