नागभीड:- चिमुर विधानसभा क्षेत्रात विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे युवा तडफदार, गोर गरिबांचे कैवारी आ. बंटीभाऊ भांगडीया आहेत. सतत गरिबांच्या मदतीला तत्पर असणारे आमदार साहेब यांनी जनतेची सेवा करतांना "जन सेवा हीच खरी ईश्वर सेवा" समजून कार्य करीत आहेत. गरीब बहिणीच्या लग्नाला लागणारी आर्थिक मदत, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत ही भाजपा पदाधिकारी- कार्यकर्ते मार्फत नेहमी करीत आहेत.
चिमुर विधानसभा क्षेत्रात गरिब जनतेला होणाऱ्या आरोग्य विषयक बाबींचा विचार करून डॉक्टर आपल्या दारी अश्या उपाययोजना राबवून निस्वार्थ पणे सेवा देत आहेत. 2018 पासून जन्माला येणाऱ्या प्रथम कन्येला आपली बहीण समजूनभविष्यात तिच्या लग्नाची मदती करिता 40,003 रुपयांचे फिक्स रोखे भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मार्फत वाटप करीत आहेत.
जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होता तेव्हा गरीब कुटुंबातील लोकांची हातची कामे गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊ नये म्हणून अन्न- किराणा किट वाटप तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मार्फत भोजन पंगत असे अनेक नियोजनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले.
ह्याच सेवा कार्याची परतफेड म्हणून नागभीड तालुक्यातील 42 ग्राम पंचायत पैकी 21 ग्राम पंचायत वरती भाजपाचे सरपंच व उपसरपंच विजयी झालेत.
तालुक्यातील भाजपा विजयी ग्रामपंचायत......
1)तळोधी(बा.) 2) कोथूळना 3)चिंधीचक 4)जनकापूर 5)किटाळी (बोर.) 6)ओवाळा 7)पारडी 8)पेंढरी (बरड) 9)विलम 10)म्हसली 11)नवेगाव (हुंडेश्वरी) 12)सोनुली बूज. 13)वैजापूर 14)बोंड 15)कोजबी (माल) 16)आकापुर 17)आलेवाही 18)चिकमारा 19)बाळापूर 20)देवपायली 21)मेंढा (किरमटी)
वरील गावातील जनतेनी मा. बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमुर विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमदार साहेबांचे मार्गदर्शनात नागभीड तालुक्यात उभे असलेल्या भाजपा उमेदवारांचा कोणताही विरोध न करता त्यांना भरघोस मताने विजयी करून भाजपाला बहुमत प्राप्त करून दिले. नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर बहुमतांनी झालेला भाजपाचा विजय हा फक्त आमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांच्या विकास कामांवर आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेनी दिलेला भाजपाला कौल आहे.