Click Here...👇👇👇

वर्ल्ड ऑन व्हील वाहनातून डिजिटल लर्निंगचे धडे.

Bhairav Diwase
दालमिया भारत फाऊंडेशनचा पुढाकार.

संगणक साक्षरता प्रशिक्षणास सुरुवात.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील आदर्श किसान विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय  येथे संस्थेचे संस्थापक स्व. शांतारामजी पोटदुखे यांच्या जयंती निमित्त दालमिया भारत फाउंडेशनच्या पुढाकाराने  डिजिटल लर्निंग लेबोरेटरी वर्ल्ड ऑन व्हील वाहनातून संगणक प्रशिक्षणास सुरवात करण्यात आली.



याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री माहोरकर सर ,  सी. एस.आर व्यवस्थापक श्री. प्रशांत भीमनवार, त्यांचे सहकारी समुह संघटक श्री. लक्ष्मण कुळमेथे, संगणक प्रशिक्षक गौरव वाढरे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष   श्री नीरेजी, गावातील सर्व बचत गट महिला मंडळ , अंगणवाडी ताई, गावातील प्रतिष्ठित नागरिक , जिल्हा परिषद शाळा  नारंडा येथील शिक्षकवृंद तथा आदर्श किसान विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय  येथील शिक्षकवृंद उपस्थित हाेते.

 वर्ल्ड ऑन व्हील  वाहनाच्या माध्यमातून शाळेतील ५ ते १२ च्या सर्व  विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणार आहे.  दालमिया भारत फाउंडेशन ही दालमिया भारत ग्रुप ची CSR चे कार्य करणारी संस्था आहे.मागील आठ दशकांपासून औद्योगिक सामाजिक क्षेत्रात दालमिया भारत ग्रुपचे देशात महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. सामाजिक दायित्वातुन या ग्रुपने दालमिया भारत फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनची सकारात्मक सामाजिक आर्थिक विकासाची भूमिका राहिली आहे. या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गम भागात असलेल्या कोरपना तालुक्यात वर्ल्ड ऑन व्हील्स ही बस उल्लेखनीय ठरणार आहे. सदर वर्ल्ड ऑन व्हील्स बस ही "स्वयंपूर्ण, इंटरनेट-सक्षम आणि सौर उर्जा सुविधायुक्त तयार केली आहे. आतमध्ये संवादक्षम स्क्रीन आणि मागील बाजूस एक स्क्रीन स्थापित केली गेली आहे, जी लोकांपर्यंत पर्यंत पोहोचण्यासाठी समूह संघटक साधन म्हणून वापरली जाऊ शकते, बसमध्ये सीसीटीव्ही देखरेख आणि बायोमेट्रिक्स वैशिष्ट्य देखील आहे. आगामी काळात परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.